लॉयनेस क्लब च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची देवरी येथे कार्यालयीन भेट

आफताब मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

देवरी, ता.२९: लॉयनेस क्लब च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची देवरी क्लब ला कार्यालयीन भेट कार्यक्रमाचे आयोजन रविवार(ता.२४ जानेवारी) रोजी येथील आफताब मंगल कार्यालयात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयनेस क्लब च्या प्रांताध्यक्ष पोर्णिमा भाले तिरोडा हे होते. या प्रसंगी चेयर पर्सन वैशाली कुंभरे तुमसर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी शिला मारगाये देवरी, ज्वाइन सेक्रेटरी वेदांता गंगाभोज, सामाजिक कार्यकर्ता राजेन्द्र भाले यांच्या सह देवरी लॉयनेस क्लब च्या अध्यक्ष संगीता पाटिल, सचिव गौरी देशमुख, कोषाध्यक्ष शिल्पा बांते, क्लबच्या माजी अध्यक्ष वैशाली संगिड़वार, वनिता दहिकर, सरोज शेन्द्रे, सुलभा भूते, डॉ. वर्षा गंगणे, अल्का दुबे, सुनंदा भूरे, लक्ष्मी पंचमवार, शुभांगी निनावे, चित्रा कडू, रीया पटले, ममता रोकड़े, शीतल सोनवाने, उर्मिला परिहार, रंजना परिहार, शुभांगी मुनघाटे, अर्चना नरवरे, कमलेश्वरी गौतम, रजनी शर्मा, आदि प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी प्रांताध्यक्ष पोर्णिमा भाले यांनी क्लबच्या सेवा कार्यबद्दल तर वैशाली कुंभरे यांनी क्लबच्या हालचाली बद्दल आणि शिला मारगाये यांनी क्लब द्वारे वर्षभरात केलेल्या सेवा कार्याचे अहवाल डिस्ट्रिक्ट व विभागीय क्लबला कशाप्रकारे सादर करावे या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच देवरी लॉयनेस क्लबच्या सचिव गौरी देशमुख यांनी क्लबचा वार्षिक अहवाल आणि कोषाध्यक्ष शिल्पा बांते यांनी क्लबचा वार्षिक खर्चाचा अहवाल सादर केला.


स्वागत पर भाषण क्लबच्या अध्यक्ष संगीता पाटिल यांनी दिले. या दरम्यान देवरी लॉयनेस क्लबच्या वतीने आणि उपस्थितीत असलेल्या अतिथिच्या हस्ते शहरातील गरजु महिलांना अन्नदानाची किट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन शीतल सोनवाने यांनी तर उपस्थितांचे आभार ममता रोकड़े यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share