बर्ड फ्लू मुळे निंबा(तेढा) हे गाव आता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

१० किमी चे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हनून घोषित

प्रहार टाईम्स

गोंदिया २३: कुक्कुटपालनाला आता ‘बर्ड फ्लू’ची धास्ती निर्माण झाली असुन गोरेगाव तालुक्यातील निंबा (तेढा) येथे ‘बर्ड फ्लू’मुळेच कोंबडय़ा दगावल्याचा अहवाल आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. निंबा (तेढा) हे गाव आता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आधीच करोनाकाळात सुरुवातीला पसरलेल्या अफवांमुळे कुक्कुटपालन व्यवसायाचे कंबरडे मोडले होते. त्यातून हा व्यवसाय सावरत असताना आता पुन्हा ‘बर्ड फ्ल्यू’ने डोके वर काढल्याने या व्यवसायासमोरील धोके वाढले आहेत.
निंबा ( तेढा) येथे ’बर्ड फ्लू’मुळे कोंबडय़ांचा मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झाल्यानंतर गोरेगाव तालुक्यातील मृत कोंबडय़ांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. निंबा गावाचा १० किमी परिसरही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

निंबा परिसरात कुक्कुटपालन हा मोठया प्रमाणात केलेल्या जातो. प्रकल्प व जोडधंदा म्हणून कोंबडीपालन केले जात आहे. जिथे ‘बर्ड फ्लू’ आढळून आला आहे, त्या ठिकाणासह आसपासच्या एक किलोमीटरच्या परिसरातील कोंबडय़ा नष्ट करण्यात येणार आहेत. या परिसरात कुणी जाऊ नये, असे आदेश अपर जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. गावासह परिसरात असलेल्या हजारो कोंबडय़ा नष्ट करण्यात येणार आहेत. जागा शोधून जेसीबीने खड्डा खोदून त्यात या कोंबडय़ा पुरण्यात येणार आहेत. त्यासाठी पशुवैद्यकीय विभागाचे पथक गावात पाठविण्यात आले आहे. निंबा ( तेढा)गावात बर्ड फ्लूने शिरकाव केल्याने हे गाव संसर्गित म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील कोंबडय़ांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून कोंबडय़ा, अंडय़ांची वाहतूक व खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. निंबा(तेढा) हे गाव आता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक कुमार मिना यांनी काढले आहे.व त्वरित उपाययोजना करण्याचेही आदेश संबंधित विभागाला दिले आहे

Print Friendly, PDF & Email
Share