गोंदिया ज़िल्हात १८९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, देवरी तालुक़यातिल भागी मतदान केंद्र बनले आहे मॉडल बूथ-

डॉ सुजित टेटे

गोंदिया – जिल्ह्यात आज १८९ ग्राम पंचायतींसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदारांनी मतदानाचा हक्क बजवण्यास सुरवात केली आहे. मात्र, सध्या थंडीचे दिवस असल्याने सकाळी मतदान केंद्रावर फारशी गर्दी दिसली नाही. ११ वाजल्यानंतर मतदान केंदावर गर्दी वाढत आहे.

नक्षलग्रस्त मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त
गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, आमगाव या चार तालुक्यात सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ आहे. तर नक्षलग्रस्त अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी आणि सालेकसा तालुक्यात सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीत ३ हजार १५१ उमेदवार रिंगणात असून ३५३ मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. ३ लाख २२ हजार ९९९ मतदार मतदानाचा हक्क बजावातील.

पोलिसांचा चोख बंदोबस्त –

ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांतता पूर्व वातावरणात पार पडाव्यात यासाठी १३९ पोलीस अधिकारी, १ हजार ३०० पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच नक्षलप्रभावित भागात जास्त बंदोबस्त करण्यात आला आहे. तर, काही अतिरिक्त तुकड्याही तैनात करून ठेवल्या आहेत.

देवरी तालुक़यातिल भागी मतदान केंद्र बनले आहे मॉडल बूथ-

मतदान जनजागृती करण्यासाठी देवरी येथिल भागी बूथ वर निवडनुक अधिकारी तथा तहसीलदार विजय बोरुदे यांच्या मार्गदर्शनात रंगीबेरंगी फुगे, छान सजावट, स्लोगन आदि लावले असुन बूथ आकर्षक तयार करण्यात आले आहे. सोशल डिस्टंस , सेनीटाँयझर, मास्क आदि गोष्टि विशेष लक्ष देण्यात आले असुन आरोग्य व्यवस्थासाठी ग्रामीण रुग्णलय देवरी ची चमू देखिल उपस्थित होती.

Print Friendly, PDF & Email
Share