गुड न्यूज़ गोंदिया जिल्ह्यात कोरोना लसीचे आगमन देवरी ग्रामीण रुग्नालयात होणार वॅक्सिनेसन

डॉ. सुजित टेटे/ प्रहार टाईम्स

?10 हजार डोजेसचा साठा उपलब्ध

?जिल्ह्यातील- गोंदिया, तिरोडा आणि देवरी येथे अशा 3 केंद्रावर होणार लॉंचिंग वॅक्सिनेसन

गोंदिया १४: जिल्हयात कोरोना लसीचे 10 हजार डोज गोंदिया ला पोहचले असून लस वाहतूक करणाऱ्या गाडीचे स्वागत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांच्या उपस्थितीत झाले. त्यांचेसह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे व माता बालसंगोपन अधिकारी डॉ. संजय पांचाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर व फार्मसी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शनिवार दि. 16 जानेवारी पासून जिल्हयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणाला शुभारंभ होत आहे. कोरोना संसर्गामुळे जगभर या लसीची प्रतिक्षा होती. राज्यासह देशात 16 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरणाला सुरूवात होत आहे. जिल्ह्यातील तीन केंद्रावर कॉरोना लसीकरण लौंचिंग मोहिमेचे आयोजन केले आहे. यात GMC गोंदिया येथील KTS रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय (SDH) तिरोडा व ग्रामीण रुग्णालय (RH) देवरी येथे LAUNCHING vaccination होईल.

या दिवशी 100 कर्मचाऱ्यांना लसीकरण चे टार्गेट आहे, त्या त्या ब्लॉक मधील आरोग्य कर्मचारी कॉरोना vaccine घेतील. ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी झालेल्यानाच फक्त vaccine मिळेल. त्या नंतर 28 दिवसांनी पुन्हा दुसरा डोस मिळेल या पार्श्वभूमिवर आज जिल्हयात 8 हजार 500 आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना ‘frontline worriers’ ला पहिल्या व 28 दिवसानंतरच्या दुसऱ्या अशा दोन्ही डोजसाठी 10000 डोजेसचा साठा उपलब्ध झाला आहे. यानंतर उर्वरीत कर्मचाऱ्यांसाठी पुढिल आठवडयात साठा उपलब्ध होणार आहे. आज आलेल्या 10000कोरोना लस आवश्यक तापमानात कोल्ड चेन मध्ये ठेवण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य विभागाने जाहिर केली.

Print Friendly, PDF & Email
Share