डॉ.सुजित टेटे । प्रहार टाईम्स

गोंदिया 13: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे आज 13 जानेवारी 2021 ला नुकतेच तातळीचे पत्र क्र रा प / वाह/सवलत/ 172 नुसार सर्व विभाग निरीक्षकांना सूचित करण्यात आले आहे.

शासन निर्णय क्र एसटीसी 1017/पत्र क्र 525/ परि-1 दि. 9/10/2018 अन्वये राज्यातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना रा प महामंडळाच्या सर्व साधारण , निम आराम बसेस बरोबरच शिवशाही (आशनी आणि शयनयानी बसने विनामूल्य प्रवास करण्याचे अनुज्ञेय करण्यात आले आहे.

सदर बसेस मधून पत्रकारांना विनामूल्य प्रवास देण्यात येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सर्व विभाग नियंत्रकांना अत्यंत तातडीचे पत्र देऊन पत्रकारांना विनामूल्य प्रवास देण्यात यावा अशी माहिती महाव्यवस्थापक वाहतूक महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केली आहे.

Share