पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत सुरक्षा गार्ड भरती / रोजगार मेळावा

◼️गोदिया जिल्हा दलातर्फे व पोलीस स्टेशन देवरी सौजन्याने व एस. आय.एस (इंडिया) लि. यांचे संयुक्त विदयामाने सुरक्षा गार्ड भरती / रोजगार मेळावा सन २०२३

देवरी◼️कम्युनिटी पोलीससिंगच्या माध्यमाने दादालोरा खिडकी योजनेर्तेत पोलीस ठाणे देवरीमार्फत येथे गार्ड भरती/रोजगार मेळावाचे आयोजन केले होते पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या संकल्पनेतुन. अपर सुरक्षा पोलीस अधिक्षक अशोक बनकर. उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन दादालोरा खिडकी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी याकरिता गोदिया जिल्हा पोलीस दल व एस.आय.एस (इंडिया) लि. यांचे संयुक्त विदयामाने २० मार्च आफताब मंगल कार्यालय देवरी येथे आयोजित करण्यात आला होता. कॅम्पला . अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर गोदिया कॅम्प देवरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण डांगे यांनी भेट देवुन मार्गदर्शन केले आयोजित मेळावाला अतिदुर्गम आदिवासी नक्षल

प्रभावित भागातील सुशिक्षित बेरोजगाराचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मेळावा मध्ये २०० ते २५० सुशिक्षित बेरोजगार सहभाग घेतले होते. १५ ते २० सुशिक्षित बेरोजगार एस. आय.एस (इंडिया) लि. मध्ये सुरक्षा गार्ड भरती करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share