दुर्गावाहिनीतर्फे जागतिक महिला दिवस कार्यक्रम

गोंदिया◼️विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा कार्यालयात विहिंप व दुर्गावाहिणीच्या वतीने जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सहयोग शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती सरकार, आदर्श भारत शाळेच्या मुख्याध्यापिका भाविका बघेले अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय सचिव माधुरी परमार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, ओमकार जप, विजय महामंत्र और दुर्गा चालिसाने करण्यात आली.

प्रसंगी स्वाती सरकार यांनी महिलांनी स्वतचे अस्तित्व निर्माण करुन कुटूंब व समाजात आपले विशेष स्थान प्राप्त करण्यासोबतच मुलांना सुसंस्कारीत करण्याचे आवाहन केले. भाविका बघेले यांनी मुलींचे जीवनातील महत्व सांगितले. तर माधुरी परमार यांनी योग, प्राणायामावर मार्गदर्शन केले. दरम्यान महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला विहिंप जिल्हा उपाध्यक्ष वंदना पाठक, मातृशक्ती जिल्हा संयोजिका स्नेहल इटानकर, दुर्गावाहिणी जिल्हा संयोजिका मनीषा नेवारे, विहिंप शहर उपाध्यक्षा सरोज चावके, दुर्गावाहिणी नगर संयोजिका आरती सरई, गीता सोनवाने, रंजना कुलकर्णी, पूजा जायस्वाल, रीता अरोरा, रुपाली रोकडे, मीना चौरागडे, सविता फाये, संगीता मानकर, रेखा चालके, कविता इटानकर, पूनम साकला, देवकी बघेले, योगिता बाहेकर, दीपा कावडे, सुशीला धार्मिक, अल्का कावळे, दीपमाला बिसेन आदी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share