गोंदिया जिल्हातील 30 हजार कर्मचारी संपावर

गोंदिया ◼️जुनी पेंशन योजना लागू करावी या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या आवाहनानुसार उद्या मंगळवार 14 मार्चपासुन जिल्ह्यातील सुमारे 30 हजार सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. या संपाला विविध कर्मचारी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे शासकीय कामे ठप्प होणार असल्याचे बोलले जाते.

कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात वारंवार शासनाशी चर्चा केली. निवेदन दिले, मात्र सरकारने समारात्मक निर्णय घेतला नाही. परिणामी जिल्ह्यातील कर्मचारी शासनाविरूद्ध संतप्त झाले आहेत. सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेंशन योजना लागु करावी, कंत्राटी कर्मचार्‍यांची सेवा नियमित करावी, शासकीय आस्थापनांवरील रिक्त पदे तत्काळ भरावीत, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची पदे निरसीत करु नये आदी अनेक मागण्यांना घेऊन 14 मार्चपासून जिल्ह्यातील सुमारे 30 हजारपेक्षा अधिक कर्मचारी संपावर जाणार असल्याचे महासंघाचे पी. जी. शहारे, शैलेश बैस, सौरभ अग्रवाल, सुभाष खत्री, संतोष तुरकर, कमलेश बिसेन, गोवर्धन बिसेन यांनी सांगीतले.

Print Friendly, PDF & Email
Share