अवैधरित्या होल्डिंग्स (बॅनर) लाऊन विद्रुपीकरण करणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई

गोंदिया◼️प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता राजकीय, सामाजिक, तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी गोंदिया शहर परिसरात अवैधरित्या होल्डींग (बॅनर) लावणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासना व्दारे जनतेला जाहीर आवाहन करण्यात आले होते. तसेच संयुक्तरित्या मोहीम आखून अवैध होल्डिंग लावनाऱ्यांवर यापूर्वी कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर यांचे निर्देश व आदेशान्वये अवैधरित्या होल्डिंग्स (बॅनर) लावणाऱ्या विरुद्ध पोलीस प्रशासनातर्फे मोहीम राबवून कारवाई करण्यात येत आहे.

या अनुषंगाने दि.28/01/2023 रोजी पो.स्टे.रामनगर हद्दीतील गोंदिया ते बालाघाट रोडवरील मुस्लिम कब्रस्तान चे समोर मरारटोली येथील म.रा.वि.वि.कंपनीचे ईलेक्ट्रिक लोखंडी पोलवर

आरोपी नामे——
1) मोहित मरठे रा.संजय नगर गोविंदपुर गोंदिया,

2) दुर्गेश उर्फ डेनी रमेश खरे,रा.बसंतनगर गोंदिया ,

3) सुशांत मेश्राम,रा. मरारटोली गोंदिया ,

4) प्रज्वल मेश्राम,रा. शिवाजी वार्ड कुडवा गोंदिया

यांनी नगर परिषद प्रशासन गोंदिया अथवा कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता म.रा.वि. वि. कंपनीचे लोखंडी पोल वर धोका दायक स्थितीत सार्वजनिक दर्शनी भागावर अवैधरित्या बिना परवानगी चा होर्डिग (बॅनर) मोहितभैय्या आपको जम्मदिन की हार्दिक शुभ कामनाए असा मजकुर व स्वतची फोटो असलेले होर्डिंग( बॅनर) लावुन शहरा चे विद्रुपीकरण केल्याने नमूद आरोपी 1 ते 4 यांचे विरोधात कलम 3 महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा 1995 अन्वये पोशि कपिल नागपुरे, पो.ठाणे रामनगर यांचार लेखी तक्रार वरुन गुन्हा नोंद करण्यात आले असुन पुढील तपास पो.हवा.भुरे, ब.न.606 हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गोंदिया मा.श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री.अशोक बनकर यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे पो. ठाणे रामनगर चे ठाणेदार श्री.संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस तर्फे मोहीम राबवून कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच यापुढे सुध्दा नगर परीषद गोंदिया अथवा इतर आवश्यक शासकीय कार्यालयाची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता अवैधपणे होर्डिंग्ज (बॅनर) लावनाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन तर्फे जनतेला असे आवाहन करण्यात येते की, नगर परिषद, तसेच संबंधित प्रशासकीय कार्यालयाची परवानगी घेवूनच होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात यावे.

Print Friendly, PDF & Email
Share