राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य बावनथडेंना जिवे मारण्याची धमकी

गोंदिया ◼️तिरोडा तालुक्यातील सुकळी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य जगदिश(बालू)बावनथडे यांना गावातील एका युवकाने जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.या घटनेनंतर तिरोडा पोलीस ठाणे येथे जिल्हा परिषद सदस्य बावनथडे यांनी तक्रार नोंदवली असून पोलिसांनी गुुन्हा दाखल केला आहे. प्रकरण असे की जि.प.सदस्य बावनथडे हे सुकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात 19 जानेवारीला नवनिर्वाचित सदस्य,सरपंच व उपसरपंचाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहून जेवणाकरीता दुपारच्या सुट्टीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभे असतांना गावातील सौरभ छबीलाल पटले या युवकांने तिथे येत गावातील नागरिकांसमोरच बावनथडेंना अश्लिल शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली.तु माझ्या भावाला फसवण्याचा प्रयत्न केलास आत्ता तुला मी बघून घेतो अशाप्रकारची धमकी देत सदस्याचा अवमान केला.पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरिक्षक दिनेश तायडे यांनी दिली.

Print Friendly, PDF & Email
Share