मुंडीपार – हरदोली – मांडोदेवी मार्गासाठी ३५ कोटी मंजूर

रस्त्याचे होणार रुंदीकरण

गोंदिया ■ गोरेगाव तालुक्यातील मांडोदेवी देवस्थान आहे. या ठिकाणी नेहमी भाविकांनी वर्दळ असते. मात्र मुंडीपार-हरदोली, मांडोदेवी या मार्गाची रुंदी कमी व मार्गाची दुरावस्था झाल्याने माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी २० कोटी व आमदार विनोद अग्रवाल यांच्या पाठपुराव्याने १५ कोटीचा असे एकूण ३५ कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. दरम्यान मार्गाचे रुंदीकरण व डागडुजी करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवासी व भाविकांना दिलासा मिळणार आहे.

गोरेगाव तालुक्यातील मांडोदेवी हे तिर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी नवरात्री, चैत्र नवरात्री दरम्यान लाखो भाविक गर्दी करीत असतात. मात्र या मंदिराकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने ये- जा करताना येणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून नेहमीच धोका निर्माण होण्याची शक्यता असते. कोणतीही जीवितहानी होऊ नये व दर्शन यात्रा सुरळीत पार पडावी, यासाठी आमदार परिणय फुके यांनी २० कोटी आणि गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी १५ कोटी, असे एकूण ३५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करून चांगला रस्ता तयार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याजवळ वसलेल्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी येतात. उल्लेखनीय असे की, आमदार विनोद अग्रवाल हे मांडोदेवी देवस्थान समितीचे आहेत. या ठिकाणी रामनवमीच्या पर्वावर येथे आंतरजातीय सामूहिक विवाह आयोजित केले जातात. मांडोदेवी देवस्थानात गोंदिया जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रासह शेजारील राज्यातूनही भाविक दर्शनासाठी येतात. मात्र मार्गाची दुरावस्था झाल्याने भाविकांना मोठे त्रास सहन करावे लागत होते. मात्र आता या मार्गाची दुरुस्ती व रुंदीकरण होणार असल्याने प्रवासी व भाविकांना दिलासा मिळणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share