स्नेहसंम्मेलनातून विद्यार्थ्यांचा सूप्त गुणांचा विकास ! प्राचार्य महेन्द्र मेश्राम

देवरी ◼️स्थानिक डवकी येथील सिद्धार्थ हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे नुकतेच वार्षिक स्नेह-संम्मेलन संपन्न झाले. दोन दिवसीय स्नेहसम्मेलनाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य महेन्द्र मेश्राम तर उद्‌घाटक म्हणून देवरी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक करंबलकर होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डवकी ग्रामपंचायतचे नवनियुक्त सरपंच गौरव परसगाये, लक्ष्मणजी नाईक, संस्था अध्यक्ष शार्दूल मेश्राम, कोषाध्यक्ष पौर्णिमा चव्हाण, तंमुस अध्यक्ष रामू परसगायें तसेच ग्रामपंचायत डवकी येथील नवनियुक्त सदस्य होते.

साप्ताहीक क्रिडा सत्र पार पडल्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत वार्षिक स्नेहसंम्मेलनाचे आयोजन करण्यात आले, प्रसंगी ग्रामपंचायत डवकी चे सरपंच गौरव परसगाये यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य महेन्द्र मेश्राम यांनी ‘स्नेहसम्मेलनातूनच विद्यार्थ्याचा सुप्त कलागुणांचा विकास होतो. शैक्षणिक कार्याशिवाय, मनाला, आरोग्याला उपयुक्त असलेले क्रिडासत्रे, स्नेहसम्मेलने ही विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. यातूनच स्वतः मध्ये दडलेल्या विविध कला, गुण इत्यादी उत्स्फुर्तपणे बाहेर येतात; आणि विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश संपादन करू शकतो.’ असे विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले.

कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी एकल नृत्य, समूह नृत्य, नकला, एकांकीका, एकपात्री ३. कार्यक्रम सादर केलेत. कार्यक्रमाची सांगता बक्षिस वितरणाने झाली. कार्यक्रमाचे संचालन वि.टी. पटले तर आभार जेटी ठवरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एक. जी निखारे, बि.बि. कुलसंगे, के. आर. कोकावार, एम.जे. टेंभरे, बोरकर, जवंजार, टेंभूर्णीकर, मारबते, इ. अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी ग्राम डबकी चै प्रतिष्ठित नागरीक, गावकरी, विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share