५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमधे ब्लॉसमचा आयुष घोडेश्वर आणि शिक्षिका तेजस्विनी नंदेश्वर प्रथम

प्रहार टाईम्स

देवरी 06: राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर पं.स. देवरी अंतर्गत शैक्षणीक सत्र २०२२– २३ या शैक्षणीक वर्षाचे ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दि.०५ व ०६ जानेवारी २०२३ रोजी न्यू सीता पब्लिक स्कूल देवरी येथे आयोजित करण्यात आले होते.

सदर प्रदर्शनी मधे प्राथमिक गटात प्रथम वंशिका रहांगडाले (जिप सावली), द्वितीय विद्या ठाकरे ( जिप पाऊडदौन्ना) तृतीय नाविन्य डोंगरे ( छत्रपती स्कूल)

माध्यमिक गटात प्रथम आयुष घोडेस्वार ( ब्लॉसम स्कूल) द्वितीय काजल तिणेकर( छत्रपती स्कूल) तृतीय आदित्य बुंदेले

आदिवासी प्राथमीक गटात प्रथम आरती कुंजाम ( शा. आस्राम) आणि माध्यमिक गटात प्रथम मुस्कान मेश्राम ( एकलव्य स्कूल)

प्राथमिक शिक्षक गटात प्रथम तेजस्विनी नंदेश्वर ( ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी ) , योगिता नेवारे ( सीता पब्लिक स्कूल) यांची निवड करण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या उद्दघाटना प्रसंगी उद्घाटक म्हणून अंबीका बंजार , सभापती पं.स. देवरी, अध्यक्ष सविताताई पुराम बालकल्याण सभापती जि.प. गोंदिया यांच्या सह प्रमुख उपस्थिती उषाताई शहारे जि.प.सदस्या ककोडी, अनिल बिसेन उपसभापती पं. स. देवरी, वैशाली पंधरे पं.स. सदस्य आलेवाडा, शालीकरामजी गुरनुले पं.स.सदस्य घोनाडी, ममता अंबादे पं.स. सदस्य पूराडा, शामकला गावळ पं.स. सदस्य चिचेवाडा, भारती सलामे पं.स.सदस्य निलज, अनुपमा सलामे पं.स.सदस्य मिसपीरी, रंजीत कासम पं.स.सदस्य कडीकसा यांच्यात प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार पडला.

सदर विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक ०६ जानेवारी २०२३ ला २.०० वाजता प्रा. डॉ. वर्षा गंगणे यांच्या अध्यक्षतेखाली ,गट शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, प्रा. डॉ. सुधीर भांडारकर, प्रा. आशिष गवडे, अनिल अग्रवाल , सुनील अग्रवाल, अंकित अग्रवाल , कमलेश फुंडे तसेच बी.डब्ल्यु. भानारकर केंद्रमुख केंद्र, देवरी, धनवंत कावळे गटसमन्वयक गटसाधन केंद्र देवरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन महेंद मोटघरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, देवरी यांच्या मार्गदर्शनात अशोक उइके न्यू सीता पब्लिक स्कूल देवरी यांनी केला. सदर कार्यक्रमाचा मुर्तरुप देण्यासाठी तालुका विज्ञान विभाग प्रमुख व्ही. डब्लू. लोथे यांनी मोलाची भूमिका बजावली.

Print Friendly, PDF & Email
Share