हत्या करणार्या आरोपीला आजन्म करावास
गोंदिया: शिकवणी वर्गाला जाणार्या अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिची एकतर्फी प्रेम प्रकरणातुन निर्दयीपणे हत्या करणार्या आरोपीला न्यायालयाने आजन्म करावासाची शिक्षा ठोठावली आहे. दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले (21) रा. चिरामनटोला ता. जि. गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, मृतक अल्पवयीन मुलगी 23 फेब‘ुवारी 2022 रोजी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास चिरामनटोला ते कामठामार्गे शिकवणी वर्गाला जात असताना झीलमिली शेत शिवारात आरोपी दुर्गाप्रसाद याने मुलीला अडवून तिच्या डोक्यावर लोखंडी हाथोड्याने वार करून ठार मारले. यानंतर आरोपीने स्वत:च्या गळा, मनगट ब्लेडने कापुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तेथे उपस्थित नागरिकांनी त्याला पकडून घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना दिली.
मुलीचे काका लोकेश राधेलाल हरिणखेडे रा.चिरामनटोला यांच्या तक‘ारीवरुन आरोपी दुर्गाप्रसादविरुद्ध भादंविच्या कलम 302, 309 अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. यानंतर प्रकरण न्याय प्रविष्ठ करण्यात आले. दुर्गाप्रसादविरूध्द दोषसिध्द झाल्याने जिल्हा सत्र न्यायधिश एन. बी. लवटे यांनी गुरूवार 22 डिसेंबर रोजी दुर्गाप्रसादला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. गुन्ह्याचा तपास रावणवाडीचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी केले. सरकारतर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता महेश चांदवानी, वकील कृष्णा पारधी यांनी युक्तीवाद केला.