ब्लॉसम शाळेत सांताक्लाज च्या परिधानात चिमुकल्यांची हजेरी

◼️ब्लॉसम पब्लिक स्कूलमध्ये ‘ख्रिसमस डे’ साजरा

देवरी २४ : तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे नाताळाच्या पार्श्वभुमीवर ख्रिसमस डे साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, शिक्षिका मनीषा काशीवार, कलावती ठाकरे, तनुजा भेलावे, योगिता मेश्राम उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पेन्सील व चॉकलेट वाटप करून नाताळच्या शुभेच्छा देण्यात आल्या. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांताक्लाजच्या वेशात शाळेत उपस्थिती दर्शवली होती. यावेळी विद्यार्थ्यांना नाताळाविषयी माहिती देण्यात आली. सांताक्लॉजची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी जिंगल बेलवर ताल धरला. सदर कार्यक्रमात ख्रिसमस चा देखावा सादर करण्यात आला होता.

ब्लॉसम च्या चिमुकल्यांनी नृत्य सादर करुन आनंदोत्सवात नाताळ साजरा केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कलावती ठाकरे यांनी केले आणि आभार मनीषा काशीवार यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share