गोंदिया जिल्हा होणार पाणी टंचाईमुक्त
गोंदियाः जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलजीवन मिशनने जिल्हावासीयांना वर्षभर पाणी देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावागावांत पाणी पुरवठा योजना राबवली जाणार आहे. यासाठी शासनातर्फे 230 कोंटींचा निधी मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यातील 6 कोटीचा निधी संबंधित विभागाला प्राप्त झाला असून उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने दिला जाणार असल्याची माहिती आहे.
गोदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत 867 गावे व 1600 वाड्यातील 2 लाख 91 हजार 691 कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी ग‘ामीण पाणी पुरवठा विभागाने नियोजन केले आहे. यासाठी 230 कोटी निधी मंजूर झाला आहे. पैकी 6 कोटी रुपये प्राप्त झाले कामेही जोमाने सुरू आहेत. वर्षभर नागरिकांना मुबलक पिण्याचे श्ुद्ध पाणी मिळावे म्हणून गावागांत उपाययोजना केली जाणार आहे. स्थानिक भागातील शाश्वत पाण्याच्या उपलब्धतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तीला दर दिवशी किमान 55 लिटर पाणी उपलब्ध व्हावे, त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहे. सन 2024 पर्यंत योजनेची कामे पुर्ण होणार असल्याचे सांगीतले जाते.
गोंदिया जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही पिण्याचे शद्ध पाणी मिळत नसल्याने जिल्हा परिषदेने जल जीवन मिशनअंतर्गत डीपीआर बनविला असून मंजूर अनेक योजनांची कामे सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे येत्रूा काळात नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. त्यासाठी वेळेवर पाणी पट्टी भरावी लागणार आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याच्या सुमस्या सुटणार आहे. योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी वेळेवर पाणी कर द्यावे, असे आवाहन जिपचे ग‘ामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे यांनी केले आहे.