स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करा – विकास राचेलवार
गोंदिया:जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय व राज्य शासनाच्या नागरी सेवेतील प्रमाण अल्प प्रमाणात आहे. तसेच अनुसूचित जमातीच्या स्पर्धा परिक्षांमध्ये बसणार्या विद्यार्थांची संख्या देखील कमी आहे. याच उद्देसाने विद्यार्थांचे परिक्षेत बसण्याचे प्रमाण वाढावे व त्यांना परिक्षामध्ये यश मिळून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता प्रशिक्षण देने अत्यंत महत्वाचे असल्याने प्रकल्प कार्यालय देवरी यांच्या विद्यमानाने प्रशिक्षण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अनेक दैनिक वर्तमान पत्रांमध्ये सदर प्रशिक्षणाची बातमी प्रसिध्द करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याबाबतच्या सुचनाही प्रकल्प कार्यालया तर्फे देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जास्ती जास्त प्रमाणात अर्ज सादर करण्या करिता दिनांक 19 डिसेबंर 2022 दुपारी 12.30 वा. पासुन ते दि.02/01/2023 मध्यरात्री 12.00 पर्यंत ऑनलाईन Registration Link आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्य वेबसाईट trti.maharashtra.gov.in वर उपलब्ध असणार आहे.
सदरच्या स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरीता उपरोक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या वेबसाईट trti.maharashtra.gov.in वर जास्तीत जास्त अर्ज सादर करण्या करिता मा. प्रकल्प अधिकारी, विकास राचेलवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षनाचा फायदा घेण्याचे आव्हान केले आहे.