देवरी तालुक्यात आ.कोरोटे यांची जादू, १७ ग्रामपंचायतीवर फडकवला कांग्रेसचा झेंडा

◼️ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या दिग्गजांची दमछाक

✍🏻डॉ. सुजित टेटे

देवरी ◼️ जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक थाटात पार पडली असून त्यांचे निकाल आज (२०) ला औद्धोगिक प्रशिक्षण केंद्र देवरी येथे धोषित करण्यात आले. सदर निवडणुकीचे निकाल बघता देवरी तालुक्यात आमदार सहसराम कोरोटे यांची जादू चालली असून तालुक्यात मोठ्या संख्येंने कांग्रेसचे समर्थित सरपंच निवडून आले आहेत. देवरी तालुक्यात एकूण २४ ग्रामपंचायतीचे निवडणुका संपन्न झाले असून १ ग्रामपंचायत निर्विरोध होती. यामध्ये १७ ग्रामपंचायतीवर काँग्रस समर्थित उमेदवार निवडून आल्याचा दावा काँग्रेस पक्षांनी केला आहे. तर भाजप ने ८ ग्रामपंचायतीवर आपला दावा केला आहे.

विशेष म्हणजे ग्रामपंचायत ओवारा येथील भाजपचे अनुभवी व माजी सरपंच कमल येरणे यांचा दणदणीत पराभव झाला असून त्यांचा पुतण्या भावराव येरणे यांनी निवडणुकीच्या २ दिवसाआधी कांग्रेस पक्ष प्रवेश करुन बाजी मारली आहे.

त्याचप्रमाणे भाजप चे माजी आमदार संजय पुराम यांचे गृहगाव ढीवरीनटोला येथे सुद्धा कांग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असून ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप ची दमछाक झालेली आहे.

आमगाव विधानसभा क्षेत्रात सालेकसा आणि देवरी तालुक्यात कांग्रेस चा दणदणीत विजय झाला असून सदर ग्रामपंचायत निवडणुकीत कांग्रेसचे प्रदर्शन जोरदार असल्याचे बघावयास मिळाले.

सदर विजयाचे श्रेय मतदार , कांग्रेस कार्यकर्ते यांना जातो.
सर्वांचे सहृदय आभार व्यक्त करतो.
सहसराम कोरोटे, आमदार , आमगांव विधानसभा
क्षेत्र

Share