शेळ्याचोरी होण्याच्या घटनेने गोंदिया जिल्ह्यात खळबळ

प्रहार टाईम्स |भुपेन्द्र मस्के

गोंदिया 01:शेळीपालन व्यवसाय हा अधिक कमी भांडवलमध्ये केला जाणारा व्यवसाय. शेळीपालनातून मोठी आर्थिक कमाई होत असते. कमीत कमी माणसात व जागेत शेळीपालन केले जाऊ शकते. शेळ्यांना आहारही कमी लागत असतो, यामुळे त्यांना गरिबांची गाय म्हटलं जातं. कडक
थंडीचा फायदा घेत चोरटे रात्री पहाटेच्या सुमारास शेळ्याची चोरी करण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. सालेकसा तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरिला गेल्यानंतर देवरी शहरालगत चिचेवाडा रविद्र लांजेवार यांचे ८ तर चुन्नीलाल मडावी यांचे ५ शेळ्यांची चोरी, पिंडकेपार येथिल चौरे यांच्या १५ ते २० त्यानंतर नकटी येथिल दखणे यांच्या सुमारे १५ शेळ्या व विविध ठिकाणावरून शेळ्या चोरी झाल्याचे वृत्त आहे.

पोलीसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. शेळ्या आणि बकरी चोरी होण्याच्या घटनेने शेळीपालकांची झोप उडाली असुन पोलिस विभागाने चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा ही मागणी शेळीपालकांची आहे. एकंदर या घटनांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Share