जिल्हास्तरीय दौड स्पर्धेत प्रिन्सी प्रथम

गोरेगाव,(वा.) : क्रीडा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत गोंदिया जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा परिषद गोंदिया यांच्या वतीने गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकूलात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील घोटी येथील सरस्वती माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्या मंदिर येथील 12 व्या वर्गाची विद्यार्थीनी प्रिन्सी अविनाश नागनाथे हिने 19 वर्षे वयोगटातून 200 मीटर दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. याचबरोबर विद्यालयातील दिव्या नंदलाल कटरे या विद्यार्थीनीने 17 वर्षे वयोगटातून भाला फेक स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त केले. दरम्यान, चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी दोघांचीही निवड करण्यात आली आहे. शाळेच्या वतीने 9 डिसेंबर रोजी प्रिन्सी व दिव्या या दोघींचे पुष्पगुच्छू देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी दोन्ही विद्यार्थीनींनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाच्या प्राचार्य बघेले, क्रीडा शिक्षक सुरेश येडेकर व आई-वडीलांना दिले.
०००००००००००००००००००

Print Friendly, PDF & Email
Share