तालुक्यातील डवकी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध

देवरीः तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी डवकी ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली आहे.डवकी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदी गौरव शामराव परसगाये यांची बिनविरोध निवड झाली.तसेच सदस्यामध्ये मिथुन शंकर राऊत,निर्मला धनलाल मेश्राम,जयलाल शिवचरण फापनवाडे,छायाबाई मोरेश्वर भोयर,अनिता प्रेमदास चौरे,दिनेश भैय़्यालाल टेंभरे,गेंदलाल बैजू ताराम व अनिता खुशाल बावणे यांचाही समावेश आहे.9 सदस्यापैकी 8 सदस्य बिनविरोध निवडून आले असून एक जागा अद्यापही रिक्त आहे.

Print Friendly, PDF & Email
Share