श्रद्धा सिडाम ची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्याः भाजप महिला आघाडी देवरी

देवरीः भंडारा जिल्हयातिल साकोली तालुक्यातील पापडा येथील ९ वर्षीय श्रध्दा किशोर सिडाम या आदिवासी मुलीची निर्मम हत्या करणान्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याबाबत देवरी तालुका भाजप महिला आघाडी यांनी तहसीलदार देवरी मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन दिले आहे.

उपरोक्त विषयाला अनुसरुन मुख्यमंत्री यांना निवेदनातून विनंती करण्यात आली असून भंडारा जिल्हयातिल, साकोली तालुक्यातील पापडा येथील ९ वर्षीय श्रध्दा किशोर सिडाम या आदिवासी मुलीचा अपहरण करुन तिची निर्मम हत्या करण्यात आली. तसेच तिचे मृतदेह तणसीच्या ढिगान्यात जाळण्यात आले. या घटनेला पुर्णरुप देणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे.अशी मागणी तालुका देवरी महिला मोर्चा कडुन करण्यात आली.

Share