गोंदिया जिल्हात फक्त 36 सारस शिल्लक, सारसाचे अस्तित्व धोक्यात

गोंदियाः लुप्त होत चाललेल्या सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनासह सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. असे असतानाही सारस पक्ष्यांचा अपघात व विविध कारणाने मृत्यू हा चिंतेचा विषय झाला आहे.

गोंदिया जिल्ह्याला विशेष ओळख देणार्‍या सारस पक्ष्यांची घटती संख्या पाहता पक्षीप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यात सारसांची संख्या 35 ते 37 असल्याचे सांगीतले जाते. सारस पक्ष्याला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. हा पक्षी दुर्मिळ पक्ष्याच्या श्रेणीत मोडतो. हा पक्षी दुर्मिळ होत असल्यामुळे त्यांचे संवर्धन आवश्यक आहे. या पक्ष्या संवर्धनाचे निर्देश गतवर्षी जिल्हा प्रशासनाला दिले होते. यानंतर प्रशासनाने सारस पक्ष्यांची सुरक्षितता व संवर्धनासाठी पावले उचलली गेलीत. विदर्भात सारस पक्षी गोंदियासह भंडारा, चंद्रपूर तर मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात या पक्ष्याचे अस्तित्व पहावयास मिळते. मात्र गत काळात सारस पक्ष्यांच्या मृत्यूमुळे पक्षीप्रेमींमध्ये चिंता वाढली आहे.

तालुक्यातील परसवाडा, झिलमिली परिसरात सारसांचे अधिवास पहावयास मिळते. काही दिवसांपुर्वी विद्युत प्रवाह व अन्य कारणांमुळे तीन सारस पक्ष्यांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी या पक्ष्यांचे अधिवास आहे त्या परिसरातुन उच्च दाब विद्युत वाहिनीचे जाळे पसरले आहे. या तारांना स्पर्श झाल्याने गत मिहन्यात एका सारस जोडीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. यानंतर सारसाचा एक पिल्लू डोंगोर्ली शिवारात जखमी आढळला. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनांमुळे सारसांची संख्या वाढण्या ऐवजी कमी होत आहे. जिल्ह्यात आत केवळ 35 ते 37 सारस शिल्लक असल्याचे सांगीतले जाते. त्यांच्या संवर्धन व संरक्षणासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलने आवश्यक आहे.

वन्यजीव, वनविभागाकडून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सारसांची गणना केली जाते. सन 2006 मध्ये 6, 2007 मध्ये 22, 2008 मध्ये 38, 2009 मध्ये 45, 2010 मध्ये 12, 2011 मध्ये 52, 2012 मध्ये 35, 2013 मध्ये 38, सन 2014 मध्ये 35, सन 2015 मध्ये 37, सन 2017 मध्ये 38, 2018 मध्ये 45, 2019 आणि 2020 मध्ये 39 सारस पक्ष्यांची नोंद झाली. यावर्षी 39 सारस पक्ष्यांची गणना झाली. परंतु काही दिवसांपूर्वी विजेचा धक्का लागल्याने एक जोडी व विषबाधेने एका Stork birds सारस पिल्लाचा मृत्यू झाला. यामुळे त्यांची संख्या कमी होऊन 36 वर आली आली.

सारस पक्ष्यांच्या मृत्यूची वेगवेगळी कारणे आहेत. ज्यामध्ये बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे. विजेच्या तारांना आदळणे, संसर्गजन्य आजार, हिंस्रपशुंद्वारे शिकार आदी कारणाने सारसांचा मृत्यू होतो. वन्यजीवप्रेमी, स्वयंसेवी संस्थांसोबतच त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे कामही प्रशासन आणि शासनाकडून केले जात असल्याचे मानद वन्यजीव संरक्षक मुकुंद धुर्वे यांनी सांगीतले.

Share