गोंदियाः जिल्हयातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अवैध धंदे सुरु असल्याने जिल्हयातील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे यांनी अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली असुन आज दिनांक ०८ / १२ / २०२२ रोजी विशेष पथक गोंदिया यांना गोपनिय सुत्रांकडुन माहिती मिळाली की, पो.स्टे. गोरगांव परीसरातुन सुंगधीत तंबाखुची वाहतुक होत आहे या खबरेवर विशेष पथक यांनी सुगंधित तंबाखुची वाहतुक करणा-या वाहनावर कार्यवाही केली. वाहनामध्ये सुंगधीत तंबाखु व गुटखा मिळुन आल्याने वाहन चालक यास सदर माल कुठून आनले याबाबत अधिक विचारपुस केली असता त्याने पो.स्टे. गोंदिया हद्दीतील मुर्री परीसरातील एक गोडाऊन दाखविले सदर गोडाऊनची तपासणी केली असता पानपराग, इगल तंबाखु, मझा १०८ तंबाखु, होला, गोल्डन, रत्ना छाप, बाबा ब्लॅक, आर.आय. हुक्का, झेनम भाग्य, चिविंग ओला, व्ही तंबाखु, राजश्री, एस. एच. सुपारी, विमल, ब्लॅक लेबल पान बहार असा एकुण २७,१०,८६१/- रुपयाचा माल मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून श्रीमती. शितल देशपांडे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, भंडारा / गोंदिया यांचे लेखी फिर्यादीवरुन ०२ आरोपी विरुध्द पो. स्टे. गोरेगाव येथे अप. क्र. ६०१ / २०२२ कलम २७२, २७३, ३२८ भादवि. अन्वये चा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, पोउपनि मंगेश वानखडे, पो. हवा. महेश मेहर ब.नं. ९८, पो.ना. शैलेशकुमार निनावे ब.नं. १९४३, पोशि. सन्नी चौरसीया ब. नं. १७२८, पोशि. दया घरत ब.नं. १५८, चापोशि. राव ब. नं. २०५५ विशेष पथक गोंदिया यांनी केली आहे.









