लाच प्रकरणातील 88 कारवाईत एकालाच शिक्षा

गोंदिया: काम करून देण्याच्या नावावर पैसे घेणार्‍यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग दणका देत आहे. मागील पाच वर्षांत अशा प्रकारच्या 88 कारवाई करण्यात आल्या आहेत. मात्र, आश्चर्याची बाब अशी की, यातील 26 प्रकरणांचा निकाल लागला असून फक्त एकालाच शिक्षा झाली आहे तर 10 जण निर्दोष ठरले आहेत.

एखाद्याचे काम करून देण्यासाठी थेट पैशांची मागणी करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. एक प्रकारे ही समाजात आता परंपराच झाली आहे. काम करायचे आहे तर पैसा लागणार हे सर्वांनाच ठाऊक आहे, यासाठी काम असलेली व्यक्तीसुद्धा तेवढी तयारी ठेवतो. मात्र, कित्येकांना पैसे खाऊ घालून काम करवून घेणे वाटत नाही. शिवाय काम करून देण्यासाठी पैशांची मागणी करणे हा गुन्हा असून यावर अंकूश ठेवण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सज्ज आहे.

यातूनच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात कित्येक कारवाया केल्या आहेत. सन 2018 पासून म्हणजेच मागील 5 वर्षांवर नजर टाकल्यास विभागाने जिल्ह्यात लाचखोरीच्या 88 कारवाया केल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 26 प्रकरणांत निकाल सुनावण्यात आला आहे. 10 जणांना निर्दोष ठरविण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे फक्त एकालाच शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे सुनावनीच्या प्रक्रियेत असलेल्या उर्वरित 42 प्रकरणाच्या निकालात किती निर्दोष सुटतात व किती लाचखोर ठरतात, यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share