पोलीस स्टेशन दवनीवाडा हद्दीतील सायगाव नदीपात्रात अवैध रेती तस्करांवर धडाकेबाज कारवाई
◼️पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे विशेष पथकाची धडाकेबाज कामगीरी
Gondia : जिल्हयातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अवैध धंदे सुरु असल्याने जिल्हयातील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे यांनी अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली असुन आज दिनांक ०५/१२/ २०२२ रोजी विशेष पथक गोंदिया यांना पो.स्टे. दवनीवाडा हद्दीत ग्राम सायगाव नदीपात्रामधुन अवैध रेतीचे उत्खनन करुन अवैधरित्या रेती वाहतुक होत असल्याबाबतची माहीती प्राप्त झाल्याने विशेष पथकाने सायगाव नदीपात्रामध्ये सापळा रचुन धाड टाकली असता तिथे चार टाटा कंपनीचे टिप्पर प्रत्येकी ०५ ब्रास रेतीने भरलेली एकुण २० ब्रास रेती किंमती ६०,०००/- रुपयाची रेती परवाना / रॉयल्टी नसतांना वाहतुक करतांनी मिळुन आले. तसेच सायगाव नदीपात्रामध्ये ०२ पोकलँड मशिनव्दारे अवैधरित्या रेतीचे उत्खनन करतांना मिळुन आले. सदर कार्यवाहीमध्ये १) ०४ टाटा कंपनीचे टिप्पर किंमती १,००,००,०००/- रुपये, २) २० ब्रास रेती किंमती ६०,०००/- रुपये, ३) ०२ हह्युंडाई स्मार्ट प्लस रोबेक्स – २१५ कंपनीचे पोकलँड किंमती १,१५,००,०००/- रुपये असा एकुण २,१५,६०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अवैधरित्या रेती उत्खनन करुन रेती चोरी करतांना मिळुन आल्याने सदर बाबत पो.स्टे. दवनीवाडा येथे आरोपी १) अमर दिगबंर बारबुदे वय ३१ वर्षे रा. दांडेगांव / एकोडी ता. जि. गोंदिया, २) महेश रामचरण शहारे वय ३५ वर्षे रा. निलागोंदि ता.जि. गोंदिया, ३) रामेश्वर हरीराम सरीयाम वय ३६ वर्षे रा. नवेगांव पो. धापेवाडा ता. जि. गोंदिया, ४) दिनेश अतंनराम चौधरी, वय ४० वर्षे रा. नवेगांव, पो. धापेवाडा, ता.जि. गोंदिया, ५) यशवंत रमेश सोनवाने वय ३५ वर्षे रा. सी.जे. पटेल कॉलेजच्या समोर तिरोडा, ता. तिरोडा जि. गोंदिया, ६) रविन्द्र दसारामजी शहारे, वय २६ वर्षे रा. लोहारा पो. सालेगांव ता. आमगांव जि. गोंदिया व टिप्पर/पोकलँड मालक नामे ७) लखन बैहलिया वय ३६ वर्षे रा. पाल चौक गोंदिया, ८) टिप्पर मालक आशीष नागपुरे वय ३७ वर्षे रा. कुडवा गोंदिया, ९) टिप्पर मालक प्रकाश फुंडे वय ५५ वर्षे रा. मरारटोली गोंदिया, १०) पोकलँड मालक सर फराज गोडील वय ३५ वर्षे रा. सेल टॅक्स कॉलनी गोंदिया यांचे विरुध्द अप.क्र. २९७/२०२२ कलम ३७९, १०९ भा. दं. वि. अन्वये गुन्हा नोंद करुन तपास सुरु करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, श्री. संकेत देवळेकर, पोउपनि. मंगेश वानखडे, पो.हवा. सुजित हलमारे ब.नं. ३८१, पो.हवा. महेश मेहर ब.नं. ९८, पो.ना. शैलेशकुमार निनावे ब.नं. १९४३, पोशि. सन्नी चौरसीया ब.नं. १७२८, चापोशि. राव ब.नं. २०५५ विशेष पथक गोंदिया यांनी केली आहे.