सारस पक्षाच्या संवर्धनासाठी स्वयंसेवकांची धडपड

गोंदिया: निसर्ग साखळीत महत्वाची भुमिका बजावणारा व शेतकर्‍यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या सारस पक्षाची सं‘या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील काही सुज्ञ तरुणांनी घेतली आहे. गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील सारस कॅपमधील 78 गावांमध्ये सारस बचावासाठी या तरुणांनी सेवा संस्था निर्माण केली.

या संस्थेच्या माध्यमातून सदस्यांनी गावातील ग‘ामसंस्थांमध्ये सारस संवर्धनासाठी लोकसहभावर संस्था उभी केली आहे. महाराष्ट्रात पुर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याच्या सिमेवरील मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सारस पक्षी पाहायला मिळतो. 18 वर्षांपूर्वी अत्यल्प असलेली सारस पक्षांची सं‘या आता बर्‍यापैकी आहे. गोंदिया, भंडारा व मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यात सारस संवर्धनाचे काम सुरू आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील सारस स्टेप मधील या पक्षांची सं‘या आज स्थितीत 84 च्या दरम्यान असल्याचे सांगीतले जाते. या तीन जिल्ह्यात सारस पक्ष्यांच्या अधिवास असल्याने संबंधित गावांमधील लोकांना सारस पक्षांचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच त्यांचे संवर्धन कसे करावे, हे सांगण्यासाठी सेवा संघ संस्थेचे तरुण गावागावात पोहोचुन जनजागृति करीत आहेत. मागील 10 वर्षांपासून सेवा संस्थेच्या अविरत कार्यामुळे गावागावात सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आता लोकांनी पुढाकार घेतला आहे.

Share