नवनियुक्त पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पद्दोंन्नती च्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदी पद्दोंन्नती देवून दिली दिवाळीची भेट

Gondia 05: महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस नाईक हे पद रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस नाईक पदावर कार्यरत पोलीस अंमलदार हे पोलीस हवालदार पदावर पद्दोंन्नती च्या प्रतीक्षेत होते. नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सा. यांनी या संबंधात तात्काळ आस्थापना मंडळाची बैठक घेऊन सेवाज्येष्ठता यादीनुसार पद्दोंन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या 236 पोलीस नाईकांना पोलीस हवालदारपदी बढती देवून पद्दोंन्नती दिलेली आहे. यात जिल्ह्यातील 16 पोलीस ठाणे, नक्षलग्रस्त भागातील आऊट पोस्ट तसेच विविध शाखेतील पोलीस नाईक यांचा समावेश आहे . पदोन्नती झालेल्या सर्व पोलिस हवालदारांचे माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा देवून सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Share