आदिवासी गोवारी समाजातर्फे गायगोधन पुजन साजरा
प्रहार टाईम्स
गोंदिया : दिवाळी सणाच्या दुसर्या दिवशी गोवर्धन पुजनाची परंपरा आहे. परंतु, यंदा सुर्यग्रहण असल्याने गोवर्धन पुजनाचा कार्यक्रम आज (ता.२६) आयोजित करण्यात आला होता. आदिवासी गोवारी समाज संघटना गोंदिया शाखा व आदिवासी गोंड-गोवारी सेवा मंडळाच्या वतीने संजयनगर, छोटा गोंदिया, सेंद्रीटोला येथे २६ ऑक्टोबर रोजी गोवर्धन पुजा कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी गोवारी संघटनेचे अध्यक्ष सुशिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. आदिवासी गोवारी समाज बांधवांनी पारंपरित पध्दतीने कार्यक्रम आयोजित करून गायगोधन पुजन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.विनोद अग्रवाल, आदिवासी गोवारी संघटनेचे अध्यक्ष सुशिल राऊत, दिपक नेवारे, मनोज नेवारे, विशाल नेवारे, अरूण जोशी, सुरज नेवारे, अरूण नेवारे, शशिकांत कोहळे, राजु शेंद्रे, गोकुल बोपचे, प्रविण नेवारे, ओम राऊत आदिंसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी गोवारी समाजाच्या वतीने आदि अनादी काळापासून परंपरा पाळली जात आहे. आदिवासी संस्कृती, डार जागणी, ढाल पुजन, गायगोधन, गाव नाचणी करून दिवाळी सण साजरा केला. ही परंपरा पिढ्यानपिढ्या पासून सुरू आहे. या अंतर्गत संजयनगर, छोटा गोंदिया व सेंद्रीटोला येथील आखरावर गोवर्धन पुजनाचे कार्यक्रम २६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात ढाल पुजन करून गोवर्धन पुजा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला गोवारी समाजाचे नागरिकांसह परिसरातील महिला-पुरूषांची उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी गोवारी समाज संघटन गोंदिया व आदिवासी गोंड-गोवारी सेवा मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
०००००