बोगाटोला येथे “आमची दिवाळी वंचितांसाठी” या उपक्रमाचे आयोजन
● गत दोन वर्षांपासून दिनबंधु ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्णप्राशन फाऊंडेशन यांच्या तर्फे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन.
● अतिसंवेदनशील भागात असलेल्या गावातील नागरिकांना नवीन कपडे,शालेय,क्रीडा साहित्य आणि फराळाचे वितरण
देवरी 25- अंधारातुन प्रकाशाकडे घेऊन जाणारा भारतीय संस्कृतीमधील दिवाळी हा महत्वाचा सण.हा सण समजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीप्रमाणे साजरा करून आनंद मिळवून घेत असतो,परंतु समाजात असेही काही व्यक्ती असतात की जे हा सण साजरा करण्यापासून वंचीत असतात.समाजातील अश्याच दिवाळी हा सण साजरा करू न शकणाऱ्या वंचीत कुटुंबासोबत सहभागी होऊन त्यांच्या आनंदात आनंद मिळवून घेण्यासाठी दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी आणि सुवर्णप्राशन फाउंडेशन साकोली तसेच मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गत २ वर्षांपासून “आमची दिवाळी वंचितांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.या लोकाभिमुख उपक्रमाअंतर्गत दि.२५ ऑक्टोबर २०२२ रोजी देवरी तालुक्यातील अतिसंवेदनशील आदिवासीबहुल निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या मेहताखेडा ग्राम पंचायत अंतर्गत बोगाटोला या गावात बिरसा ब्रिगेड चे संघटक चेतनकुमार उईके, दिनबंधु ग्रामीण विकास संस्थे चे अध्यक्ष कुलदिप लांजेवार,सुवर्णप्राशन फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ सुनील समरीत,नवोदय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश रहांगडाले, सचिव निखील झिंगरे, केंद्रप्रमुख युवराज कोल्हारे, ग्राम पंचायत सदस्य सुनील भोगारे,दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव सौ कल्याणी लांजेवार,सुवर्णप्राशन
फाऊंडेशनच्या सहसचिव सौ.हितेश्री समरीत,विश्वस्त दिपक लांजेवार यांच्या उपस्थित आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात जवळपास ५५ कुटुंब प्रमुख यांना नवीन कपडे,फराळ व मिष्ठान या साहित्याचे वितरण करण्यात आले.यामद्ये सर्व कुटुंबातील लहान व मध्यम बालकांना नवीन कपड्यांसह शैक्षणिक साहित्य,गावातील युवकांच्या व्हालीबॉल संघाला व्हॉलीबॉल आणि नेट वितरीत करून अनोख्या रुपात दिवाळी हा सण साजरा करण्यात आला.यापुर्वी ग्राम बोगाटोला येथे कधीही अशा प्रकारचे उपक्रम झाले नसल्याने लहान बालकांसह ज्येष्ठ वृद्ध महिला आणि पुरुष मंडळी यांच्या चेहऱ्यावर वेगळे हास्य निर्माण उमटतांनाचे चित्र बघावयास मिळाले.तर दिवाळी सारखा महत्वाचा सण साजरा करण्यापासून वंचित असणाऱ्या या कुटुंबाच्या प्रवासात आनंद बघून एक वेगळा आत्मानंद मिळत असल्याच्या भावना आयोजकांकडून व्यक्त केल्या गेल्या. गत २ वर्षापासून संस्थेला मिळत असलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न होत असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले.या उपक्रमाला ३ वर्ष पूर्ण होत असून संस्थाना आर्थिक व वस्तू स्वरूपात सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे यावेळी आभार आयोजकांकडुन व्यक्त करण्यात आला असून संस्थेद्वारे आयोजित लोकाभिमुख उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेच्या विश्वस्त मंडळींनी केलेलं आई.आयोजित उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनिराम उसेंडी,राजू तुलावी यांच्या सह संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.