1.77 कोटीचे धानाचा घोटाळा

गोंदिया: सालेकसा येथील समृद्ध किसान शेती उद्योग साधना साधनसामृग्री पुरवठा व खरेदी विक्री सेवा सहकारी संस्थेत 1.55 कोटीचा धान घोटाळा प्रकरण ताजे असतानाच आता तालुक्यातील गोर्रे येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत 1 कोटी 77 लाख 37 हजार 938 रुपयाच्या धान आणि बारदाना घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी शुक्रवारी 14 ऑक्टोबर रोजी 11.30 च्या सुमारास 14 संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

गोर्रे येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने 2021 आर्थिक वर्षात शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत खरिपात एकूण 14580.40 क्विंटल तसेच रब्बी हंगामात 31015.40 क्विंटल असा एकूण 45 595.80 क्विंटल धान खरेदी केले होते. त्यापैकी 36 832.33 क्विंटल धानाचा पुरवठा करण्यात आला. त्यानुसार 8763.47 क्विंटल धान शिल्लक असणे गरजेचे होते. मात्र, आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय भंडाराचे लेखा व्यवस्थापक समर्थ सुरेशराव भागवत यांनी 2 ऑक्टोबर रोजी या संस्थेच्या गोदामात केलेल्या तपासणी केवळ 150 क्विंटल धानसाठा शिल्लक असल्याचे आढळले. यावरून 8613.47 क्विंटल धानाचे अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संचालकांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. तर उर्वरित आरोपी फरार आहेत.

Share