ब्लॉसम स्कूलमधे “आरोग्य हिच संपत्ती” जनजागृती कार्यक्रम
देवरी: २७ ब्लॉसम पब्लिक स्कूल व्यावहारिक शिक्षणाच्या संकल्पनेचे अनुसरण करत असून अद्वितीय संकल्पनासाठी लोकप्रिय आहे. नुकतेच प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्री प्रायमरी विभागासाठी शाळेमध्ये ‘हेल्थ इज वेल्थ’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना मूलभूत चांगल्या सवयी आणि वैयक्तिक आरोग्यसवयी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. दात कसे घासायचे?, हात कसे धुवावे?, नखे आणि केसांची काळजी कशी घ्यावी?, नीटनेटका आणि स्वच्छ गणवेश कसा ठेवावा? सदर चांगल्या सवयी विद्यार्थ्याला प्रात्यक्षिकासह आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्याना पटवून दिले. दातांची स्वच्छता आणि हात धुण्याच्या प्रात्यक्षिकातही विद्यार्थी सहभागी झाले होते. या अनोख्या संकल्पनेसाठी पूर्व प्राथमिक शिक्षिका तनुजा भेलावे, कलावती ठाकरे, आणि मनीषा काशीवार यांनी परिश्रम घेतले.