देवरीचा राजा जिल्हात प्रथम, उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पुरस्कार जाहीर

प्रहार टाईम्स

गोंदिया 12 : जिल्हातील आदिवासी नक्षलग्रस असलेल्या देवरी येथील नवयुवक किसान गणेश मंडळ आपल्या नानाविविध सामाजिक उपक्रमासाठी ओळखला जातो. यावर्षी उत्कृष्ट गणेश मंडळाचे राज्य शासनाने प्रस्ताव मागविले होते त्यामधे देवरीच्या राजा ने आपले नाव रोवले असून गोंदिया जिल्हाला नवी ओळख मिळवून दिली आहे.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री. खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाला तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हानिहाय गणेश मंडळाची यादी

गणेशोत्सव काळात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत जिल्हयातून एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तर समितीमार्फत प्रत्येकी एक याप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण 36 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र तसेच 33 जिल्हयातील अन्य प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसही 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

सदर पुरस्कार जाहीर होताच नवयुवक किसान गणेश मंडळाचे अध्यक्ष दिनेश भेलावे यांनी सर्व जनतेचे, मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share