देवरी तालुका मुख्याध्यापक संघाच्यावतीने सेवानिवृत्त प्राचार्य आणि मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा संपन्न

देवरी १२: तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याधापक संघ देवरीच्या वतीने नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्राचार्य के. सी. शहारे आणि मुख्याध्यापक व्ही. एम. चुटे यांचे सपत्नीक सत्कार करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरी पंचायत समितचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे , मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष दुबे, बाबुराव मडावी शाळेचे मुख्याध्यापक घोडसेलवार सर, ब्लॉसम पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक डॉ. सुजित टेटे मंचावर स्थानपन्न होते.

सेवानिवृत्त त्यांचा सपत्नीक ह्दयसत्कार समारंभ मुख्याध्यापक संघाच्या वतीने शाल श्रीफळ ,भेट वस्तू व सन्मान चिन्ह ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.

व्यासपिठावर संघाचे अध्यक्ष सुभाष दुबे यांनी प्रास्ताविकेतून संघाची परंपरा विषयी प्रकाश टाकला. यांच्या सेवेतील आठवणी जाग्या केल्या. सत्कारमूर्ती प्राचार्य केसी शहारे यांनी संघटना कशी वाढवायची आणी संघटन कसे करावे , त्यांच्याकामाची पध्दत,शिस्तप्रिय, कर्तव्य दक्ष आणी क्षमाशील अशी वर्तणूक यावेळी व्यक्त केली. शिक्षक सेवेत असताना अनेक विद्यार्थीघडवून आदर्श विद्यार्थी कसा घडवला पाहिजे सत्कारमूर्ती मुख्याध्यापक चुटे यांनी व्यक्त केले. लागेल तेव्हा आपल्याला सहकार्य मिळाले असे मत सेवानिवृत्त सत्करमूर्तीनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम विद्यालयाचे मुख्याद्यापक जीतेंद्र रहांगडाले यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोहरभाई पटेल विद्यालयाचे प्राचार्य जी.एम. मेश्राम यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशासाठी संघाचे पुर्व अध्यक्ष मुख्याध्यापक विनोद गिरहेपुंजे, महेंद्र मेश्राम, रझिया बैग तसेच उपस्थित सर्व मुख्याध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share