कन्हाळगांव येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

◼️दिनबंधु ग्रामीण विकास संस्था तर्फे आयोजन

देवरी- राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन अंतर्गत समाजातील सर्व जनतेचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी सर्वोतोपरी लोकाभिमुख उपक्रमाचे आयोजन करून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते,त्या अंतर्गत लहान बालकांना लहान पणा पासून रोगप्रतिकारक शक्ती वाढावी या हेतूने राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून यावर्षी देशभरात जंतनाशक मोहीम आयोजित करण्यात आली होती,त्या अंतर्गत दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कन्हाळगांव येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र फुटाना येथील आरोग्य अधिकारी डॉ.दोषांत हुमने यांच्या अध्यक्षतेखाली तर दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार यांच्या विशेष उपस्थिती मद्ये करण्यात आले होते.यावेळी प्रमूख अतिथी म्हणून मुख्याध्यापक प्रकाश शहारे,सीएचओ मेश्राम आदी उपस्थित होते.जंतनाशक दिनानिमित्त केंद्र शासना तर्फे राबविली जाणारी जंतनाशक मोहीम याविषयी जनजागृती व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य सुदृढ राहून त्यांच्या शैक्षणिक विकासासोबत बौद्धिक विकास कसा होईल,जंतनाशक गोळी ची आवश्यकता का आहे,या विषयांवर मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना आयोजकांकडून केळी वितरीत करून जंतनाशक वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यापक शहारे यांनी तर संचालन व आभार टी. के.मातवारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विरेंद्र खोटोले, जीवन आकरे,प्रकाश गावडकर,नागेश कसोंदि यांच्यासह संस्थेच्या आणि आरोग्य विभागाच्या सहकार्यांनी सहकार्य केले.

Share