पोषण सप्ताह अभियान आदर्श शाळा सावली येथे थाटात संपन्न

प्रहार टाईम्स
देवरी 21: आदर्श शाळा सावली येथे महिला व बालकल्याण विभागातर्फे पोषण सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष झुलन ताई पंधरे सरपंच सावली, उद्घाटक सविताताई पुराम महिला व बालकल्याण सभापती जि प गोंदिया, प्रमुख अतिथी अंबिकाताई बंजार पंचायत समिती सभापती देवरी, ममता ताई अंबादे पंचायत समिती सदस्य, वैशालीताई पंधरे पंचायत समिती सदस्य, राजेश्वरी ताई बिंजलेकार उपसरपंच सावली, चंद्रसेन रहांगडाले पो.पा. सावली,मंजू ताई बिसेन सरपंच वडेगाव ,पुष्पाताई मडावी सरपंच , नाजुका ताई गौतम ग्रामपंचायत सदस्य ,भाग्यश्री ताई बारशे सरपंच डोंगरगाव, सुषमाताई वैद्य सामाजिक कार्यकर्ता ,अनिल भेलावे शा.व्य.श., उमेश महारवाडे, सिद्दिकी ताई, डॉक्टर येरणे , मुरली चव्हाण सर डोंगरगाव, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला गटाच्या सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे संचालन प्रभा सलामे सुपरवायझर, कार्यक्रमाचे प्रस्ताविक नेताम मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार दीपक कापसे मुख्याध्यापक सावली यांनी मानले व सभापती मॅडम यांना शाळेतील रिक्त जागा पूर्ण करण्याविषयी विनंती केली. त्वरित पुराम मॅडम यांनी मा. मुख्य कार्यपालन अधिकारी याचे नावे रिक्त जागा पूर्ण करणे विषयी प्रस्ताव पाठवला. तसेच त्यांनी पोषण सप्ताह विषयी महिलांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुलींना त्यांच्या अडचणी विषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांचे डान्स व अंगणवाडी सेविकांचे पथनाट्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मीनाताई राठोड अंगणवाडी सेविका सावली, बिनजलेकरताई, डोयेताई अंगणवाडी सेविकाडोंगरगाव सावली, शेंडे सर, चांदेवार सर, कोवले सर, लांजेवार सर ,कापसे ताई डोमनबाई ,भागनबाई , पोषण आहार मदतनीस यांनी व सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Share