दोन पेक्षा जास्त प्रवाशी ऑटो मध्ये बसविन्याची परवानगी मिळवून द्या

देवरी येथील ऑटोचालक यूनियन ची आमदार कोरोटे यांच्याकडे मागणी

प्रहार टाईम्स प्रतिनिधी

देवरी, ता.२४; कोरोना विषाणु संसर्गाच्या संचारबंदित पूर्वीच आर्थिकरित्या हवालदिल झालेला ऑटोचालक यांनी आता अनलॉक मुळे तो स्वतः व आपल्या कुटुंबाला सावरन्याचा काम सुरु केले आहे. परंतु आता पोलिस विभागाकड़ून देवरी-चिचगड मार्गावरिल ऑटोचालकांना २ पेक्षा जास्त प्रवाशी ऑटोमध्ये बसविन्याची मनाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या समोर कुटुंबाचा उदरनिर्वाह व ऑटो देखरेख कशाप्रकारे करावी असा गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने शेवटी ऑटोचालक यूनियन देवरी-चिचगड चे पदाधिकारी व सदस्य गण यांनी आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांना भेटून त्यांच्यासोबत उद्धभवलेल्या समस्ये विषयी चर्चा केली

यामधे २ पेक्षा जास्त प्रवाशी ऑटोमध्ये बसविन्याची परवानगी मिळवून देन्यासंबंधात निवेदन बुधवारी (ता.२३ डिसेम्बर) रोजी सादर केले.


यावेळी आमदार सहषराम कोरोटे यांनी ऑटोचलकांना तुमच्या समस्या विषयी पोलिस विभागाशी बोलनी करुण त्या त्वरित सोडविन्याचे आश्वासन दिले.


निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात ऑटोचालक यूनियन देवरी-चिचगड चे प्रमुख सुरेश शर्मा(पप्पू), धरमदास अंबारवाड़े, समीन पठान, गणेश गुप्ता, मनीष पाथोडे, वशिम पठान, शैलेश कोचे, सागर शर्मा, राधेश्याम फुंडे, मनोज टेंभुर्ने, देवा घरात, कैलाश देशमुख, राजेश राऊत, व चंदन शर्मा आदिंचा यात समावेश होता.

Share