जिल्हात आता शनिवारी भरणार दप्तरमुक्त शाळा;मुकाअ यांचे निर्देश

गोंदिया-पुस्तकांचा वाढता ओज्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना अनेक त्रासाला समोर जावे लागते. हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने जि.प.चे मुख्य अधिकारी अनिल पाटील यांनी आठवड्याच्या दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम राबविण्याचा निर्देश दिला आहे. त्यामुळे आजपासून येणार्‍या प्रत्येक शनिवार जिल्हा परिषद शाळा दप्तरमुक्त भरणार आहेत. विशेष म्हणजे, या दिनी दप्तरमुक्त आलेल्या विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंदमय ज्ञानरचनावादी शिक्षण देण्याचे सुचनाही करण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौध्दीक विकास व्हावा, या दृष्टीकोनातून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्यातल्यात्यात दप्तराच्या ओज्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शारीरिक त्रास सहन करावा लागतो. या त्रासापासून आठवड्यापासून एक दिवस विद्यार्थी मुक्त रहावा व शाळेत हसत-खेळत आनंदमय ज्ञानरचनावादी१ शिक्षण मिळावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती यशवंत गणवीर यांच्यासह मुख्याधिकारी अनिल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दप्तरमुक्त शनिवार हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाची अंमलबजावणी ८ सप्टेंबरपासून करण्यात यावी, अशा सुचनाही जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना दिल्या आहेत. दर शनिवारी जिल्ह्यातील जि.प.शाळा दप्तरमुक्त भरणार आहेत. या उपक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान शालेय प्रशासनाला छायाचित्र संग्रहीत करून दर सोमवारी ते छायाचित्र व्हॉट्सअप गृपवर टाकण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यात आठवड्यात प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरणार आहेत.

दप्तरमुक्त दिनी आनंदमय वातावरणात शिक्षण
दफ्तर मुक्त शाळा हा उपक्रम आठवड्यातून प्रत्येक शनिवारी राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कला, क्रीडा, संगीत, कार्यानुभ या विषयांना प्राधान्य देण्यात यावे, शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यात यावी, परिपाठ, योगासने, कवायत, वाचनकार्ड द्वारे प्रकट वाचन, वैयक्तीक, सामूहिक मराठी, इंग्रजी व हिंदी कविता गायन विविध खेळाच्या स्पर्धा, नृत्य स्पर्धा, सामान्य ज्ञान मार्गदर्शन, पर्यावरण शिक्षण, चांगल्या सवयी मार्गदर्शन, पुरक आहार, शालेय पोषण आहार वाटप, हसत खेळत आनंदमय ज्ञानरचनावादी शिक्षण व्हावे या उद्देशाने विद्यार्थी पालकांना व शाळा व्यवस्थापन समितीला दफ्तरमुक्त शनिवार याची माहिती अगोदर देण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share