नवीन बुटामुळे चिमुकल्यांच्या चेहर्यावर आनंद
गोंदिया: शासकीय अधिकार्यांचा हा केवळ प्रशासनाचा भाग नसून त्याला सामाजिक बांधलिकीचे भान ठेवावे लागते. असे अधिकारी प्रशासनात मोजकेच पहायला मिळते. याच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी आमगाव जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय बुटाचे वितरण केले.
आमगाव येथे शासकीय दौर्यावर असताना त्यांना गणपती मंडळांने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला भेट दिली. यावेळी मंडळाच्या पदाधिकार्यांनी ते राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. यात जिप शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करीत असल्याचे सांगितले. तसेच शाळेत शिकणार्या अनेक गरीब विद्यार्थ्यांकडे पायात घालण्यासाठी साधी चप्पल देखील नसल्याची माहिती दिली. दरम्यान चौबे यांनी शाळेला भेट दिली असता अनेक विद्यार्थ्यांच्या पायात साधी चप्पलही नसल्याने निदर्शनास आले. चौबे यांनी सामाजिक बांधिलकीचे भाग ठेवून तातडीने अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले व आपल्या काही अधिकारी मित्रांच्या सहकार्याने गावातील व्यावसायीकाकडून बुट घेतले व विद्यार्थ्यांना भेट दिले. नवीन बुट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्या आनंद बघण्यासारखा होता. जिप शाळेत गरीब व गरजू कुटूंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र घरच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शैक्षणिक साहित्यही खरेदी करता येत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होतो. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या उत्पन्नातील छोटा हिस्सा अशा विद्यार्थ्यांसाठी खर्च केल्यास या विद्यार्थ्यांचे आयुष्य निश्चित सुकर होऊ शकते.