‘गणेश उत्सव हा आरोग्य उत्सव ‘ म्हणून साजरा करूया : दिनेश भेलावे अध्यक्ष देवरीचा राजा

🛑आरोग्य विभागाच्या चमूचा मोलाचा सहकार्य

प्रहार टाईम्स

देवरी 05: देवरीच्या राजाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त कोरोना लसीच्या बूस्टर डोज लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गणेश उत्सवाच्या माध्यमातून आरोग्यदायी उपक्रम राबवून सामाजिक दायित्व पूर्ण करण्याचा मानस असल्याचा मत दिनेश भेलावे यांनी व्यक्त केला.

देवरी चा राजा म्हणून ओळख असलेल्या राज्यशासन पुरस्कृत नवयुवक किसान गणेश मंडळ देवरी यावर्षी 54 वे वर्ष साजरे करीत आहे . त्यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून आज बूस्टर डोज शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कॅम्प मध्ये 50 लाभार्थ्यांनी बूस्टर डोज चा लाभ घेतला असून मंडळातील सदस्यांनी व गणेश भक्तांनी लसीकरण करून घेतला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनेश भेलावे, मंडळाचे उपाध्यक्ष बापू निर्वाण , कैलास सोनवाणे , सचिव संजय बळगये ,बंडू कापसे , बाला निर्वाण चंदू कुंडलीकर निखिल शर्मा अजित बघेले इ उपस्थित होते. यावेळी नम्रता मांगले यांच्या सह आरोग्य विभागाच्या चमूचा आभार मानण्यात आला.

Share