“एक काम वतन के नाम” या उपक्रमाला 5 वर्षीय सचरूपचा मदतीचा हात
🛑अतिव्रुष्टीत नुकसान झालेल्या त्या 40 कुटुंबाच्या मदतीला चिमुकलीचा हात
🛑देवरीचे नगरसेवक सॅंकी भाटिया यांची कन्या आहे सचरूप कौर
देवरी 04 : शहरात अतिव्रुष्टीमुळे 40 कुटुंबाना फटका बसला होता. त्यांचे कुटुंब आर्थिक तंगीत आले. त्यानां मदतीचा हात म्हणुन आर्थिक मदत करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार करण्याचे आवाहनजिल्हाचे अपर पो. अधिक्षक अशोक बनकर यांनी केले होते. यांच्या संकल्पनेने “एक काम वतन के नाम” या सामाजीक उपक्रमाअंतर्गत 5 वर्षीय सचरूप कौर भाटिया या चिमुकलीने पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांची प्रत्येक्ष भेट घेत आपल्या खाऊचे पैसे मदद म्हणून दिले आहे.
सदर उपक्रमाला जास्तीत जास्त दानदात्यानी सरळ हाताने मदत करण्याचे आवाहन यावेळी पोलीस विभागाने केले असून साचरूपकौर भाटिया हीच सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.