पीएम किसान योजनेची kYC करण्यासाठी कृषिविभागाची जनजागृती
देवरी 04: केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेची kYC करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी Kyc करणे आवश्यक आहे.
योजनेपासून कुठलाही शेतकरी अलिप्त राहू नये म्हणून कृषी विभागाद्वारे देवरी तालुक्यातील पुराडा येथे ग्राहक सेवा केंद्राच्या मदतीने कॅम्प लावून kyc करण्याचे काम सुरु केले आहे. यामध्ये क्षेत्रातील शेतकऱ्यांनी kyc करून घेतले असून जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाचे ललिता धनगाये , ग्राहक सेवा केंद्र चे. भुमेश साखरे आदीनी मोलाची कामगिरी केली.