छत्रपती शिवाजी तंत्रनिकेतन येथील अणुविद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त घोषवाक्य स्पर्धा आयोजित

देवरी 06: छत्रपती शिवाजी तंत्रनिकेतन, देवरी येथील अणुविद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांकरिता घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. एम. खतवार, प्राचार्य, सी. एस. आय. टी., देवरी तसेच प्रमुख अतिथी आर. एल. मेश्राम, एकेडमिक इन्चार्ज, श्री. ए. डब्ल्यू. झोडे, प्रभारी विभाग प्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी, कु. मनिषा डोये, प्रभारी विभाग प्रमुख, संगणक अभियांत्रिकी तसेच एम. एम. तरोणे, प्रभारी विभाग प्रमुख, अणुविद्युत अभियांत्रिकी हे मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांकरिता आयोजित
घोषवाक्य स्पर्धेमध्ये संस्थेतील एकूण ४० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यापैकी विजेत्या पहिल्या तीन स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक तसेच मोमेंटो देवून त्यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन कु. स्मिता कांबळे, प्रास्ताविक श्री. एम. एम. तरोणे तसेच आभार प्रदर्शन कु. सुप्रिया सोनेवाने मैडम यांनी केले. एकंदरीत कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, छत्रपती शिवाजी तंत्रनिकेतन विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा शांततेत सुव्यवस्थीतपणे पार पडला.

Print Friendly, PDF & Email
Share