शेवटच्या लोकांपर्यंत आरोग्य सेवा व शालेय शिक्षण पोहचविण्याकरिता प्रयत्नशिल राहणार: जि.प.सदस्य उषाताई शहारे

■ ककोडी प्राथमिक आरोग्य केन्द्रात निशुल्क चश्मे वाटप व सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार सोहळा

देवरी,ता.०३: ग्रामीण व अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रातील लोकांच्या आरोग्याच्या विषयाला समजून शासनाने लोकसंख्याच्या आधारावर प्राथमिक आरोग्य केन्द्र स्थापना केली आहे. या प्रा.आ. केन्द्राच्या माध्यमातून लोकांना योग्य औषधोउपचार देण्याचा प्रयत्न केला जातो. मी जेव्हापासून या क्षेत्रातून निवडून आलो आहे. तेव्हापासून या भागातील प्रा.आ.केन्द्रावर पूर्ण लक्ष केन्द्रित करूण शेवटच्या लोकांपर्यंत आरोग्य सेवा व शालेय शिक्षण पोहचविण्या करिता प्रयत्नशील राहण्याचे प्रतिपादन ककोडी जि.प. क्षेत्राचे सदस्य उषाताई शहारे यांनी केले.
उषाताई शहारे ह्या ककोडी प्राथमिक आरोग्य केन्द्रात गुरूवार (ता.१ सप्टेंबर) रोजी आयोजित निशुल्क चश्मे वाटप व सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांनी बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य उषाताई शहारे ह्या होत्या. या प्रसंगी ककोडीच्या सरपंच मिताताई मडावी, उपसरपंच भैय्यालाल जांभुळकर, माजी सरपंच रियाज खान, उद्योगपती सचिन अग्रवाल, ओ.बी.सी.संघटनेचे तालुकाध्यक्ष नरेन्द्र शांडील, मिसपिर्रीचे उपसरपंच जिवनलाल सलामे, ग्रा.पं. सदस्य राउतताई, चिपोटाचे प्रतिष्ठित नागरीक संजय ताराम, वैद्यकिय अधिकारी डॉ. आकाश कुकडे, आरोग्य सेविका हेमा मरकाम, क्याम्प्यूटर आफरेटर आशीश अंबांदे, राजू भोयर, अरूण शेंडे, रवि मेश्राम,सेवानिवृत्त प्रयोगशाळा तज्ञ रामभाऊ बोरकर यांच्यासह ककोडी परिसरातील नागरीक व आरोग्य कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी उषाताई शहारे यांच्या हस्ते एकूण ३० गरजू लाभार्थांना निशुल्क चश्मे वाटप आणी सेवानिवृत्त प्रयोगशाळा तज्ञ रामभाऊ बोरकर यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.
दरम्यान उषाताई शहारे ह्या पुढे म्हणाल्या की, ककोडी प्रा.आ.केन्द्रा अंतर्गत १ वैद्यकिय अधिकारी,१ स्टाप नर्स, ४ आरोग्य सेवक, १ स्त्री परिचर तसेच सहा ही उपकेन्द्रात फक्त कंत्राटी आरोग्य सेविका आहेत. अशा सर्व पदे नियमित स्वरूपात त्वरीत भरण्या संदर्भात जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.याकडे कार्यवाही करतीलच तरी आपल्याकडे आता जेवढे कर्मचारी आहेत त्याच आधारे या क्षेत्रातील लोकांना आरोग्य सेवा पुरवाव्या अशा सुचना हि उषाताई शहारे यांनी केल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन नेत्र चिकित्सय अधिकारी सोनल बिऊटे यांनी तर उपस्थितांचे आभार वैद्यकिय अधिकारी डॉ. नंदिनी रामटेककर यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share