नवयुवक किसान गणेश मंडळ देवरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

◼️नगरपंचायत सभापती तनुजा भेलावे यांच्या सह गणेश भक्तांनी केलं रक्तदान

देवरी 03 : देवरी चा राजा म्हणून ओळख असलेल्या राज्यशासन पुरस्कृत नवयुवक किसान गणेश मंडळ देवरी यावर्षी 54 वे वर्ष साजरे करीत आहे . त्यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर रक्तदान शिबिरात नगरपंचायत देवरीचे महिला व बालविकास सभापती तनुजा भेलावे यांच्या सह मंडळाचे अध्यक्ष दिनेश भेलावे , कैलास सोनवाने , बाला निर्वाण , निखिल शर्मा , आदी पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व जपले.

सदर शिबिराच्या यशासाठी मंडळाचे पदाधिकारी , महिला यांनी मोलाचे सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share