ब्रेकिंग:शालेय पोषण आहारात आढळल्या चक्क अळ्या व सोंडे

◼️अळ्या सोंडे असताना देखील शिजविण्यात आले अन्न ◼️चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, वरिष्ठ प्राथमिक शाळा अंजोरा येथील प्रकार

अंजोरा 03- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अंजोरा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून पुरविण्यात येणाऱ्या शिवलेल्या भागात चक्क अळ्या व सोंडे आढळल्याने मोठी खळबळ उडाली. ही बाब लक्षात येताच विद्यार्थ्यांच्या लक्ष्यात येताच विध्यर्थानी अन्न बाहेर टाकले. अन्यथा, या अन्न मुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असती. व विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आले असते. काय चालेल या अंजोर वरिष्ठ प्राथमिक शाळेत. या घटनेला घेऊन पालक वर्गांचा शाळेवर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शासनाने माध्यान्ह भोजन देणे सुरू केले आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषणआहार पुरविण्याची शासनाची योजना आहे. हा पोषण आहार शाळांमध्येच शिजविला जात असून शाळेतील शिक्षकांच्या देखरेखीखाली काही महिलाच्या हातळून अन्न शिजविले जाते. मात्र अंजोर येथील शाळेत मधल्या सुटीत विद्यार्थ्यांना भोजन वाटप करीत असताना विद्यार्थ्यांना शिजवलेल्या आहारात चक्क अळ्या व सोंडे असलेले अन्न दिले जात असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्ष्यात येताच विध्यर्थानी संपूर्ण अन्न बाहेर टाकून दिले. याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना होताच पालकांनी शाळेवर मोर्चा काळात तीव्र संपत व्यक्त केला आहे.

Share