पोलीस वसाहत गणेश मंडळात रांगोळी स्पर्धा थाटात संपन्न

◼️प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर आणि पोलीस निरीक्षक सिंगनजुडे

देवरी 02: पोलीस वसाहत देवरी तसेच पोलीस विभागा तर्फे गणेश उत्सव लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या प्रित्यर्थ विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून रांगोळी स्पर्धा थाटात पार पडली .

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर आणि पोलीस निरीक्षक सिंगनजुडे उपथित होते. स्पर्धेचे मूल्यांकन डॉ. सुजाता ताराम आणि डॉ. प्रियांका येरणे यांनी केले. सदर स्पर्धेत 17 स्पर्धक सहभागी झाले असून पोलीस विभागातील कर्मचारी आणि गणेश मंडळातील उपस्थित महिलांनी मोलाचे सहकार्य केले .

Print Friendly, PDF & Email
Share