देवरी येथे “विकेल ते पिकेल ” अभियानास सुरुवात

देवरी २४: महाराष्ट्र शासन कृषिविभागाच्या धोरणात्मक निर्णयानुसार देवरी तालुका कृषिविभागाच्या पुढाकाराने मंगळवार दिनांक २२/१२/२०२० रोजी “विकेल ते पिकेल ” अभियानाअंतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार संकल्पनेवर आधारित ” शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र” देवरी आठवडा बाजारात शेतकऱ्यांना विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.

देवरीचे तालुका कृषिअधिकारी जी.जी.तोडसाम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरीचे मंडळकृषि अधिकारी विकास कुंभारे, चिचगडचे मंडळ कृषिअधिकारी चंद्रकांत कोळी आणि तालुक्यातील क्षेत्रिय कृषिपर्यवेक्षक, कृषिसहाय्यक यांच्या अथक प्रयत्नाला यश येत आहे. देवरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल तसेच नक्षलग्रस्त भागातील शेतकरी हा पारंपरिक भातशेती मधून आर्थिक प्रगती साधत आहे.त्याच बरोबर संतुलित पौष्टिक आहार व दैनंदिन गरज लक्षात घेता फळे व भाजीपाला याना अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून आजकाल शेतकरी बागायती नगदी भाजापाला पिकांचे भरमसाठ उत्पादन घेत आहे परंतु प्रचलित मूल्यसाखळीमध्ये घाऊक व्यापारी, दलाल ,कीरकोळ विक्री करणारे व्यापारी अतिशय गुंतागुंतीची व्यवस्था आहे त्यामुळे शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल दर मिळाल्याने शेतकरी खुप अडचणीत सापडला आहे.

त्याच बरोबर ग्राहक हा खुप महागात भाजीपाला खरेदी करत आहे कारण शेतकऱ्यांकडून दलाल व्यापारी लोक मिरची २० रु प्रति कीलो या दराने खरेदी करतात .तेच मिरची ग्राहकाना ८०रु प्रतिकीलो या दराने खरेदी करावे लागते. विद्यमान मूल्यसाखळी अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललेली आहे. कीरकोळ व्यापारी बाजारात भाजीपाला उत्पादक शेतकर्याना बसून विक्री करु देत नाहीत .बसायला मज्जाव करतात. त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आपला शेतमाल कवडीमोल दराने लिलाव पध्दतीने देऊन निघून जात आहे. त्यामुळे या व्यवस्थेमध्ये उत्पादक व ग्राहक या दोन्हीही घटक नाराज असून दोघांचेही संरक्षण करणे शासनाला जिकिरीचे झाले आहे. उत्पादक व ग्राहक संरक्षण होऊच शकत नाही. हे लक्षात येत आहे .परंतु कृतीतून शक्य नव्हते म्हणून शासनाच्या कृषिविभागाने संशोधन करुन शेतकऱ्यांना संजीवनी देण्यासाठी अतिशय फायद्याची प्रस्तावित मूल्यसाखळीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामध्ये संत शिरोमणी सावतामाळी या भाजी उत्पादन करुन स्वतः भाजी विकणारे संताच्या नावे शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे..त्यानुसार देवरी जि.गोंदिया येथे थेट भाजीपाला विकणार्यांची नोंदणी करण्यात येत असून दिवसेंदिवस शेतकरी संख्या वाढत आहे.

या विक्री केंद्रात ग्राहक म्हणून उषाताई मेंढे (माजी जि.प सदस्या) या मान्यवरांसह असंख्य ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी उपस्थित झाले होते..सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिपर्यवेक्षक वाढई,पांडे,जमदाल,येडाम व तालुक्यातील सर्व कृषिसहाय्यक ,शेतकरी उत्पादक शेतकरी गट प्रमुख,शेतकरी प्रोड्युसर कंपनी ककोडी, कन्हाळगाव ,पदमपूर,सावली, डोंगरगाव ,भागी येथिल शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.. देवरीचे कृषिसहाय्यक श्री पंचभाई यानी आभार मानले..

Print Friendly, PDF & Email
Share