देवरी येथे ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी उत्साहात संपन्न
प्रहार टाईम्स
देवरी 24: राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर पं.स. देवरी अंतर्गत शैक्षणीक सत्र २०२१ – २२ या शैक्षणीक वर्षाचे ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दि. २४ ऑगष्ट २०२२ रोजी मनोहरभाई पटेल हाय. तथा कनिष्ठ महाविदयालय चिचगड रोड, देवरी येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या उद्दघाटना प्रसंगी उद्घाटक म्हणून अंबीका बंजार , सभापती पं.स. देवरी, अध्यक्ष सविताताई पुराम बालकल्याण सभापती जि.प. गोंदिया यांच्या सह प्रमुख उपस्थिती उषाताई शहारे जि.प.सदस्या ककोडी, वैशाली पंधरे पं.स. सदस्य आलेवाडा, शालीकरामजी गुरनुले पं.स.सदस्य घोनाडी, ममता अंबादे पं.स. सदस्य पूराडा, शामकला गावळ पं.स. सदस्य चिचेवाडा, भारती सलामे पं.स.सदस्य निलज, अनुपमा सलामे पं.स.सदस्य मिसपीरी, रंजीत कासम पं.स.सदस्य कडीकसा यांच्यात प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार पडला.
सदर विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण सोहळादिनांक ४.०० वाजता के. सी. शहारे माजी प्राचार्य मनोहरभाई पटेल हायस्कूल तथा कनिष्ठकला व विज्ञान महाविद्यालय देवरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बी.डब्ल्यु. भानारकर केंद्रमुख केंद्र, देवरी, जी.एम. बैस केंद्रप्रमुख केंद्र, चिचेवाडा, धनवंत कावळे गटसमन्वयक गटसाधन केंद्र देवरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन महेंद मोटघरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, देवरी यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य जी. एम. मेश्राम मनोहरभाई पटेल हायस्कूल तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय देवरी यांनी केले आहे.