बेकायदेशिरपणे “महाराष्ट्र शासन” लिहून गैरवापर करणाऱ्या वाहनांवर त्वरीत कारवाईचे आदेश

◼️नरेशकुमार स्वरुपचंद जैन यांनी केली होती कारवाईची मागणी

◼️माहितीच्या अधिकारातून मागितली होती परिवहन आयुक्तकार्यालय ला माहिती

प्रहार टाईम्स

गोंदिया/देवरी : महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हाधिकारी व त्यांच्या अधिनस्त येत असलेल्या विभिन्न विभागातील खाते वाहनांवर, प्रवासी परवाना व राष्ट्रीय परवाना व खाजगी वाहनांवर आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील खाते वाहनांवर नियमबाह्य “महाराष्ट्र शासन” लिहून वाहने मार्गस्त करण्यात येत असल्याची तक्रार आणि वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ लिहिण्याची परवानगी कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात देवरीचे नरेशकुमार स्वरुपचंद जैन यांनी मागीतली होती.

त्यांच्या अपिलिलीवर दि. २२/०८/२०२२ रोजीची अपिल सुनावणी मध्ये झालेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, सर्व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, यांना पत्राद्वारे बेकायदेशिरपणे “महाराष्ट्र शासन” असे लिहून गैरवापर करणाऱ्या वाहनांवर त्वरीत कारवाईचे आदेश अभय देशपांडे परिवहन उप आयुक्त (अं-२) महाराष्ट्र राज्य, मुंबई. परिवहन आयुक्तकार्यालय यांनी दिले आहेत.

नरेशकुमार स्वरुपचंद जैन यांनी या कार्यालयास केलेल्या तक्रारीस अनुषंगाने माहिती अधिकार आणि प्रथम अपिल सादर केले होते, दि. २२/०८/२०२२ रोजी झालेल्या अपिल सुनावणीस अनुसरुन वाहनांवर बेकायदेशिरपणे “महाराष्ट्र शासन” असे लिहून गैरवापर करणाऱ्या वाहनांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा आणि एक प्रत तक्रारदारास पाठविण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share